पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना असेच चित्र पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाला.
Continues below advertisement
Pune navale bridge accident
Continues below advertisement
1/8
पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना असेच चित्र पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाला.
2/8
नवले ब्रिजजवळ तीव्र उतारावरून येत 4 ते 5 गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झालं आहे.
3/8
अपघातात एक कंटेनरसह तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे, तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.
4/8
नवले पुलावर गेल्याच आठवड्यात झालेल्या अपघाताच्या जखम्या ताज्या असतानाच आणखी एका अपघाताची घटना घडली. दुपारी नवले पुलाच्या तीव्र उतारावर चार ते पाच गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे.
5/8
दरम्यान, गेल्या आठवड्यात गुरुवारी नवले पुलावर भयंकर अपघात झाला होता, त्यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे.
Continues below advertisement
6/8
पुण्यातील या पुलावर आठवडाभरात दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
7/8
दरम्यान, आजपासूनच नवले ब्रिजवरील वाहतूक धीम्या गतीने करण्यात आली होती. कारण, येथील पुलावरुन प्रवास करताना वाहनांना 30 च्या स्पीडने गाडी चालवणे बंधनकारक केले होते. मात्र, तरीही अपघाताची घटना घडली आहे.
8/8
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर पुण्यातील नेत्यांनी आणि प्रशासनाने बैठक घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात आढावा घेतला आहे.
Published at : 17 Nov 2025 05:49 PM (IST)