Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री व्हा! अजित पवारांच्या जबऱ्या चाहत्याने थेट शपथविधीचा उभारला देखावा
पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने आणि अजित पवारांच्या जबऱ्या फॅनने थेट अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा उभारला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बाप्पाकडे साकडंदेखील घातलं आहे.
या देखाव्याची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
पुण्यातील नांदेड सिटी येथे राहणारे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी एक राजकीय ही राजभवनाची प्रतिकृती उभी केली आहे.
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यात रंगते त्यामुळे त्यांनी हा देखावा उभारला आहे.
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, पवार साहेब, नितीन गडकरी, रामदास आठवले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांची उपस्थिती दाखविली आहे.
त्याचबरोबर काही हिंदी बच्चन, शाहरुख ,सलमान अमीर खान, रजनीकांत, नाना पाटेकर अशोक सराफ, सचिन अशा मराठी सिनेमातले अभिनेत्यांनी सुद्धा शपथविधीत सहभाग दाखवला आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि तरुण पिढींची इच्छा आहे ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, त्यामुळे लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं बाप्पाचरणी घातलं आहे.
हे डेकोरेशन सादर करताना त्याच्यामध्ये जाड पुठ्ठ्याचे शीट वापरले आहेत, डिझाईन केलेले फ्लेक्स, एलईडी लाईट, अजितदादा अर्थमंत्री असताना घेतलेले निर्णयाचा माहिती फ्लेक्स, अशा स्वरूपात देखावा सादर केला आहे.