Accident News: बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; पिंपरी चिंचवडमध्ये खाजगी बस जळून खाक, पहाटे पाच वाजताची घटना
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
05 Jan 2025 09:40 AM (IST)
1
पिंपरी चिंचवडमध्ये एका खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे, या घटनेत बस जळून खाक झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र, बस चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली आहे, चालकाने वेळीच गाडी थांबवली अन प्रवाश्यांना खाली उतरवले.
3
डांगे चौक ते औंध मार्गावर जगताप डेअरी चौकात ही घटना आज पहाटे पाच वाजता घडली आहे.
4
या घटनेत बसच्या पाठीमागील भाग जळून खाक झाला. अग्निशमन दलाने आणि नाना काटे फाउंडेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
5
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बस चालकाच्या प्रसंगावधनाने ही दुर्घटना टळली आहे.