Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात; भर चौकात मागून आलेल्या ट्रकनं दुचाकीला उडवलं; क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं, महिलेचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी

Pune Accident News: अपघातानंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

Pune Accident News

1/7
पुणे : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला.
2/7
या दुर्घटनेत 29 वर्षीय दिपाली युवराज सोनी यांचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले आहेत.
3/7
सीसीटीव्ही फुटेजनुसार, MH 14 AS 8852 क्रमांकाच्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिली. स्कूटरवर दोघे प्रवास करत होते.
4/7
अपघात एवढा भीषण होता की, दिपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी अवस्थेतील जगदीश सोनी यांना स्पायरल हॉस्पिटल, गंगाधाम चौक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
5/7
अपघातानंतर काही वेळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51), राहणार भवानी पेठ, पुणे असे आहे.
6/7
या प्रकरणी BNSS कलम 105 आणि आयपीसी 304 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात कसा आणि कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
7/7
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Sponsored Links by Taboola