Pune Accident News: जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; पीएमटी बस अन् दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, बसचालकाला बेड्या
Pune Accident News: अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Pune Accident News
Continues below advertisement
1/5
जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
2/5
हा अपघात सकाळी सुमारे 8:40 वाजता भिलारेवाडी वळणाजवळ झाला आहे.
3/5
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकल (क्र. MH12/FB/0348) यांची समोरासमोर धडक झाली. यात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
4/5
मृतांमध्ये आकाश रामदास गोगावले (वय 29, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) यांचा समावेश आहे. तर नेहा कैलास गोगावले (वय 20) ही गंभीर जखमी असून तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
5/5
अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Published at : 14 Oct 2025 11:56 AM (IST)