Pune Accident Fire : चाकणमध्ये कंटेनरला भीषण आग; 40 नव्याकोऱ्या बाईक जळून खाक
Pune Accident Fire : कंटेनर चालकाने डिझेल भरण्यासाठी मालकाला फोन केला असता. मालकाने फोन न उचल्याने कंटेनर पेट्रोल पंपाच्या बाजूला पार्क केला.
Continues below advertisement
Pune Accident Fire
Continues below advertisement
1/7
पुण्यातील चाकणमध्ये पेट्रोल पंपाच्याजवळ पहाटेच्या वेळी डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली, यात कंटेनरमधील 40 नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्यात.
2/7
तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडी गावातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर NL-01AE-7346 नंबरचा कंटेनर डिझेलतळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडी गावातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर NL-01AE-7346 नंबरचा कंटेनर डिझेल भरण्यासाठी आला होता. भरण्यासाठी आला होता.
3/7
कंटेनर चालकाने डिझेल भरण्यासाठी मालकाला फोन केला असता. मालकाने फोन न उचल्याने कंटेनर पेट्रोल पंपाच्या बाजूला पार्क केला.
4/7
त्यानंतर काही वेळात एका रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने चालकास कंटेनर मधून धूर येत असल्याची माहिती दिली.
5/7
त्यावर चालकाने कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता आगीचे लोळ बाहेर पडले. यात 40 इलेट्रिकल दुचाकी होत्या.
Continues below advertisement
6/7
त्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
7/7
घटनास्थळी तातडीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्यासह अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टाळला.
Published at : 30 Nov 2025 10:16 AM (IST)