Photo : आता AC बसमधून करा मनमुराद 'पुणे दर्शन'; PMPML ची नवी बससेवा सुरु
पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळांच्या सुट्ट्या लागल्या आहेत, लहान मुलांना (PMPML)कुठे घेऊन जायचं, फिरायला जायचे असेल तर कुठे आणि कसं जायचं?, हे सगळे प्रश्न पुणे महानगर परिवहन महामंडळाने सोडवले आहेत.
पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.
या बस शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत असणार आहेत. या सेवेसाठी प्रत्येकी प्रत्येक मार्गावर वेगवेगळे दर असतील.
यापूर्वी तिकीटाच्या किमतींमुळे या सेवेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. सोशल मीडियावर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने, पीएमपीएमएलने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी ही घोषणा केली.
पीएमपीएमएलच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वातानुकूलित ई-बस प्रवाशांना पुणे आणि आजूबाजूच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळी घेऊन जातील. एकूण सात पर्यटक बस सेवा आहेत आणि सुधारित तिकीट दर सर्व मार्गांवर लागू करण्यात आले आहेत.
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या ठिकाणी बुकिंग करता येईल.
सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली). वाडेबोल्हाई छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसार्वी मंदिर (चिंचवडू), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गांथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी ही ठिकाणं प्रवाशांना पाहता येणार आहेत