Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारी शाळेतील पोरं हुशार, दहावीतील विद्यार्थ्यांनी साकारली ई-बाईक
सरकारी शाळेतील पोरं हुशार, दहावीतील विद्यार्थ्यांनी साकारली ई-बाईक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लाजवेल अशी कामगिरी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली आहे.
दहावीतील विद्यार्थ्यांनी चक्क इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांनी ही किमया साधली.
जमाना इलेक्ट्रिक गाड्यांचा आहे. इलेक्ट्रिक बाईक महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवली आहे.
पिंपरी चिंचवडमधील थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी ही कमाल करून दाखवलीये.
सरकारी शाळेत सोयी सुविधा मिळत नाहीत, असं नेहमीचं कारण पुढं करत पालक आपल्या मुलांचं इंग्रजी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतात.
तर त्याच सरकारी शाळेतील शिक्षक पगार घेऊन आला दिवस पुढं ढकलण्याचं काम करतात.
मात्र प्रबळ इच्छाशक्ती असली तर त्या शाळेत अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात.
हे पिंपरी चिंचवडमधील थेरगावच्या माध्यमिक विद्यालयाने सिद्ध करून दाखवलं.