Pune: पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा बसलाच! पहाटेपासून कारवाईला सुरुवात, मोठा पोलीस बंदोबस्त

पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीयेथे अखेर अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडलाच.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या कारवाईसाठी पालिकेची पथकं पहाटेचं तैनात करण्यात आली. पोलिसांनी ही कारवाईस्थळी जाणारे मार्ग बंद केले.

दिवस उजेडताच कारवाईचा बडगा उगरण्यात आला. परिसरातील नागरिकांना काही काळण्यापूर्वी हातोडा पडल्यानं गेल्या आठवड्याप्रमाणे तणाव टळला.
भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी दुकानदार या व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवरील कारवाईला पहाटेपासूनच सुरवात केली आहे
कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत.
या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ५ हजार अनधिकृत आस्थापनांना महापालिकेच्या ‘क’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत.
कारवाईला घेऊन स्थानिकांमध्ये नाराजीचा सुर मात्र कायम आहे.
शनिवारी (दि.८) पहाटेच महापालिकेने कारवाईस सुरवात केली. मोठा पोलिस बंदोबस्त आहे.
कारवाई होणारच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.