PCMC Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये तळवडे एमआयडीसीमध्ये अग्नितांडव, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवडमध्ये तळवडे एमआयडीसीमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागली आहे. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
PCMC fire
1/8
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
2/8
आणखी काही कामगार या आगीत फसल्याच बोललं जातंय.
3/8
तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये.
4/8
हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे.
5/8
काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत.
6/8
दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.
7/8
आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.
8/8
वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांचं गोदाम होतं.
Published at : 08 Dec 2023 04:31 PM (IST)