In Pics : MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन
पुण्यातील अहिल्या शिक्षण मंडळाबाहेर एमपीएससी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाज्योतीच्या पुण्यामधील UPSC आणि MPSC च्या मुलांना Delhi प्रमाणे आणि सारथी किंवा बारटी प्रमाणे 18000 आकस्मित निधी मिळाला पाहिजे, यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
हा निधी दिवाळीच्या आधी मिळाला पाहिजे, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या निधीच्या मुद्द्यावरुन ऐन दिवाळीत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
महाज्योतीने MPSC साठी फक्त एकच संस्था निवडली आहे.
प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या स्टायपेंडसाठी असाच संघर्ष करावा लागणार असेल तर आम्ही स्टडी कधी करणार आणि अपेक्षित उद्देश कसा साध्य करणार?, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
महाज्योतीचा कारभार नीट नसल्याने आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
बारटी आणि सारथीप्रमाणेच वागणूक द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.