Paddy Art : भातशेतीवर साकारला 'ब्लॅक ईगल', पाहा फोटो
निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर साकारणारे हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग सातव्या वर्षी पॅडी आर्ट साकारण्यात आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतामध्ये 'कृष्ण गरूड' अर्थात 'ब्लॅक ईगल' (Black Eagle) साकारला आहे.
पुण्यातील इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे.
भरारी घेतलेल्या गरुडाचे हे चित्र हिरव्या काळ्या भातरोपांच्या लावणीतून तयार केले आहे. कृष्ण गरूड सह्याद्रीच्या सर्वोच्च माथ्यावरच्या सदाहरित जंगल उतारांवर दिसतो.
पिवळी चोच आणि पाय याखेरीज या गरुडाची पिसे काळी असतात. झाडांलगत तरंगत पक्षी, साप, खारी अशी भक्ष्ये शोधताना दिसतो.
भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, आंबोली या दाट जंगलांवर काळ्या रंगामुळे आणि घुटमळत तरंगण्याच्या सवयीमुळे सहज ऒळखता येतो.
पावसाळ्यात ढगांमुळे त्याला भक्ष्य दिसत नसल्याने कमी पावसाच्या डोंगरांवरही दिसतो. यंदा साकारलेला 'कृष्ण गरूड' किंवा 'ब्लॅक ईगल' हा सुमारे 80 फूट (रुंद) लांब आहे.
सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपाजवळील लेक्सॉन वाइंडर्स येथे बघायला मिळू शकते.
जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले.
पॅडी आर्ट' साकारताना जमिनीचा एका 'कॅन्व्हास'सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते.
image 11