Pimpri Chinchwad : एक पाय निकामी, तरीही रायगड किल्ला सर; 11 वर्षाच्या ओमकारची जिद्द
Pimpri Chinchwad News : हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है. ही शायरी पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने सत्यात उतरवली आहे. अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला सर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील सहावीची सहल 20 जानेवारीला रायगडावर जाणार होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास वाचून प्रेरित झालेल्या ओमकारने गडावर येण्याची प्रखर इच्छा व्यक्त केली.
त्याचा हा हट्ट पाहून शिक्षक ही अवाक् झाले. पालकही ओमकारच्या पाठिशी उभे राहिले. हे पाहून शाळेने त्याला रायगडावर घेऊन जाण्याचं निश्चित केलं.
ठरल्याप्रमाणे 20 जानेवारीच्या सकाळी रायगड सर करायला सुरुवात झाली. पण आता ओमकारला हे शक्य होईल का? आधीच एक पाय गमावलेल्या ओमकारला आणखी काही दुखापत तर होणार नाही ना? अशा प्रश्नांचा काहूर शिक्षक अन् इतर विद्यार्थ्यांच्या मनात करु लागले.
ओमकार लकडेने मात्र जे ध्येय बाळगलं होतं, तो त्या दिशेने आगेकूच करु लागला. कोणाचीही मदत न घेता केवळ त्याच्या साथीला असणाऱ्या कुबड्यांच्या मदतीने तो जोमाने अन् सर्वांसोबत गड सर करु लागला.
शिवकाळात घोड्यांच्या टापांचा जसा आवाज रायगडावर घुमायचा अगदी तशीच अनुभती ओमकारचा कृत्रिम पाय अर्थात कुबड्यांमुळे येत होती. बघता बघता निम्मा टप्पा सर झाला होता, पण तरीही सोबतीला असणारे संजय येणारे, मदन साळवे, अनिता विधाटे हे शिक्षक आणि विद्यार्थी ओमकारसाठी चिंतेत होते.
तो थकू नये म्हणून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष वारंवार केला जात होता. आजूबाजूने निघालेले इतर शिवभक्त ही ओमकारला पाहून आश्चर्यचकित व्हायचे अन् त्याला प्रोत्साहन देत होते.
शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित शिवभक्त यांच्या साथीने सव्वा दोन तासात ओमकार लकडेने रायगड किल्ला लीलया सर केला अन् त्याच जोमाने तो खालीही उतरला.
ओमकारने केलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे. म्हणूनच ओमकारच्या या जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीला एबीपी माझाचा सलाम....!
Pimpri Chinchwad News : हौसला बुलंद हो, तो हर मंजिल आसान लगती है. ही शायरी पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने सत्यात उतरवली आहे. अपघातात पाय गमावून बसलेल्या ओमकार लकडे या विद्यार्थ्याने चक्क रायगड किल्ला सर केला आहे.