Nirmala nawale : सरपंच मॅडमचा नवऱ्याकडे 'रेंज रोव्हर'चा हट्ट, अन् झटक्यात 3 कोटींची कार दारात
Nirmala nawale : सरपंच मॅडमचा नवऱ्याकडे रेंज रोव्हरचा हट्ट, अन् झटक्यात 3 कोटींची कार दारात
Sarpanch Nirmala nawale
1/10
Nirmala nawale : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतात.
2/10
निर्मला नवले कारेगावच्या सरपंच तर आहेतच मात्र सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रावर त्यांचे 509K फॉलोवर्स आहेत. त्यामुळे नवले मॅडम यांनी शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात.
3/10
काही महिन्यांपूर्वी निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये नवऱ्याकडून त्यांना रेज रोव्हर ही कार गिफ्ट मिळाली होती.
4/10
दरम्यान, रेंज रोव्हरचं सरप्राईज मिळाल्यानंतर निर्मला नवले यांचा आनंद गगनात मावत नव्हता..हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
5/10
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्मला नवले यांनी रेंज रोव्हर मागची कहाणी सांगितली आहे.
6/10
निर्मला नवले म्हणाल्या, खरंतर रेंज रोव्हर घ्यायचं माझं स्वप्न होतं. मी शुभमला नेहमी बोलायचे, की ही कार मला घ्यायची आहे. कारण मला जी गोष्ट हवी असते ती हवीच असते. शुभम मला ती मिळवून देतात. त्यामुळे मला सवय लागली आहे नवऱ्याला म्हणायचं की, तू काही पण कर मला मिळवून दे... ही सवय मला नवऱ्याने लावली आहे.
7/10
निर्मला नवले यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.
8/10
सध्या त्या कारेगावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
9/10
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिलीये.
10/10
त्यामुळे राजकारणात देखील त्यांची जोरदार चर्चा रंगलीये.
Published at : 07 Mar 2025 09:02 PM (IST)