In Pics : नव्या वर्षाची सुरुवात करताना 'या' मंदिरांना भेट द्या
दगडूशेठ गणपती मंदिर (dagdusheth temple) प्रत्येक पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती. कोणत्याही कामाची सुरुवात असो किंवा स्वप्नपूर्ती असो प्रत्येक पुणेकर नतमस्तक होण्यासाठी दगडूशेठ चरणी जात असतात. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जायला हवं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारसबाग गणपती मंदिर (sarasbaug temple) सारसबाग गणपती मंदिराला तळ्यातला गणपतीचं मंदिर म्हणूनही ओखळलं जातं. मंदिर परिसरात मोठी बाग आहे. साकडं पूर्ण करणारा जागृत मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. मंदिराचा गणपती पांढऱ्या गारेचा आणि आकर्षक आहे. अनेक पुणेकर साकडं घालण्यासाठी या मंदिराला भेट देतात.
ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar temple) भगवान शिवाला समर्पित, ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पेशव्यांच्या राजवटीत बांधण्यात आलेले हे मंदिर शहरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मुख्य मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीशिवाय, लहान मंदिरे देखील आहेत .ज्यात भगवान गणेश, देवी दुर्गा, भगवान शनी, भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती आहेत. अनेक शंकराची पूजा करणारे आवर्जून या मंदिराला भेट देतात.
कसबा गणपती मंदिर (Kasba Temple) पुण्यातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत अशी या मंदिराची ओळख आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान या मंदिर परिसरात सण साजरे करण्यास सुरुवात केल्यानंतर ते लोकप्रिय झाले. तेव्हापासून हे मंदिर गणपतीशी संबंधित उत्सवासाठीही महत्त्वाचे बनले आहे. मंदिराचे वैभव पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.
नावाप्रमाणेच हे मंदिर समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंच डोंगरावर आहे. पुण्यातील या सुंदर मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला 103 पायऱ्या चढाव्या लागतील. नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी व्यायामाचं नियोजन केलं असेल तर पर्वतीला जायलाच हवं. ठिकाण: पार्वती पायथा, पुणे