Pune Govinda Reservation: लुडो, गोट्या अन् मंगळागौरीचे खेळ खेळत गोविंदांच्या आरक्षणाविरोधात राष्ट्रवादीचं उपहासात्मक आंदोलन

Pune

1/8
गोविंदांना पाच टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थांनी विरोध दर्शवला. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येत पुण्यातील फर्ग्यूसन रोडवर आंदोलन केलं.
2/8
या आंदोलनात अनेक विद्यार्थी आणि राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले होते.
3/8
अभ्यास सोडा, गोविंदा बना अशी घोषणाबाजी केली.
4/8
यावेळी विटी दांडू, गोट्या, फुगड्या आणि मंगळागौरीचे खेळ करत ते या खेळालाही आरक्षण देणार का?, असा प्रश्न उपस्थित केला.
5/8
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कष्टाला कमी लेखण्यारं सरकार आम्हाला नको, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.
6/8
आम्ही आयुष्यभर अभ्यासच करायचा का? असा सवाल स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
7/8
विद्यार्थीनींनी लुडोचा डाव मांडला आणि विरोध दर्शवला
8/8
स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थींनी रस्त्यावर गोट्या खेळत संताप व्यक्त केला.
Sponsored Links by Taboola