Mumbai Pune Express Highway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात बर्निंग टॅंकरचा थरार; पाहा फोटो...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बर्निंग टॅंकरचा थरार पाहायला मिळाला. ऑईलचा टॅंकर पलटी झाल्याने टॅकर जागीच पेटला.
Mumbai Pune Express Fire
1/11
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली आहे.
2/11
मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
3/11
ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.
4/11
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला.
5/11
त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.
6/11
टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे.
7/11
या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, एक मृतदेह एक्सप्रेसवेवरच पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
8/11
या टँकरची आग विझावण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता आहे. मात्र सध्या IRB यंत्रणा पाण्याच्या टँकर ने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
9/11
काही किरकोळ जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
10/11
ब्रिजवर ऑईल टॅंकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खालीदेखील या आगीच्या झळा पोहचत आहे. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते तीन गाड्यांनादेखील आग लागली आहे. मात्र ट्रॅंकर ऑईलचा असल्याने स्फोट होण्याची भीती अग्निशमन दलाचे जवान व्यक्त करत आहे.
11/11
असं असलं तरी मागील तासाभरापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published at : 13 Jun 2023 01:55 PM (IST)