खासदार संभाजीराजे छत्रपती किल्ले विसापूर व लोहगडास दिली भेट
खासदार संभाजीराजे छत्रपती सोमवारी किल्ले विसापूर व लोहगडास भेट दिली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकमेकांना लागूनच असलेल्या विसापूर व लोहगडास किल्ल्यांचे स्वराज्यात महत्त्वाचे स्थान होते. पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेलगतच असल्याने शिवभक्त व दुर्गप्रेमींसह पर्यटकांचाही या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात राबता असतो.
या गडांवर भक्कम तटबंदीसह, दरवाजे व इतरही वास्तूंचे अवशेष आढळतात. गडावरील पाण्याची टाकी गडाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.
यांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून स्थानिक दुर्गप्रेमी संस्थांसह नक्कीच या गडांवर काम करू.
महाराष्ट्राचा हा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आधी आपण तो पाहिला पाहिजे, अनुभवायला पाहिजे, त्याच्या उन्नतीसाठी आपणच कष्ट घेतले पाहिजेत.
आजपर्यंत मी अनेक गडकोट पाहिले आहेत. गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी माझे मन व शरीर कधीच थकत नाही. या गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी देखील मी झटतो आहे. माझ्या या प्रयत्नांना तमाम शिवभक्त व दुर्गप्रेमींची भक्कम साथ मिळते आहे, याचा मला आनंद आहे.

या संपूर्ण भेटीत विश्वास दौंडकर, रोहीत जंगम, प्रसाद चाकणकर, अनिकेत आंबेकर व चेतन जोशी या विसापूर व लोहगड किल्ल्यांवर काम करणाऱ्या दुर्गसेवकांसह गडपायथ्याच्या पाटण गावचे सरपंच विजय तिकोने व त्यांचे सहकारी माझ्यासोबत होते.