Pune Rain Update: छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune Rain Update: पुढील 24 तासात पुणे आणि घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Continues below advertisement

Pune Rain Update

Continues below advertisement
1/6
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
2/6
पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. यामुळे मे महिन्यात नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
3/6
पुढील 24 तासात पुणे आणि घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
4/6
रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
5/6
तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा भागांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, या भागांनाही ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे.
Continues below advertisement
6/6
पुण्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मागील दोन आठवड्यांपासून पूर्वमोसमी पाऊस ठाण मांडून बसला आहे.
Sponsored Links by Taboola