Pune News : पूर परिस्थितीसाठी पुणे प्रशासन सज्ज; खेडमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन
इर्शाळवाडीतील घटनेनंतर पुणे प्रशासन सज्ज झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशी घटना पुण्यातील ग्रामीण भागात घडू नये यासाठी तयारी सुरु केली आहे.
पुणे जिल्हा आरोग्य विभाग आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर आणि भूस्खलनाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी मॉक ड्रिल आयोजित केले होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या इतर भागातही अशा मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सरकारी विभाग त्यांची तयारी तपासण्यासाठी या सरावात सहभागी झाले होते.
भीमा-भामा नदी संगमावरील शेल पिंपळगाव गावात पूरस्थिती हाताळण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आलं.
आरोग्य विभाग आणि चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते.
ड्रिल दरम्यान एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि त्याला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) देण्यात आले.
त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून डमी रुग्णाला शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मॉक ड्रिल घेण्यात आलं.