In Pics : मिशन क्राईम! पुण्यात गुन्हेगारीविरोधात धाडसत्र सुरुच
पुण्यातील 'G-20' परिषद आणि वाढत्या (Pune Crime News) दहशतीच्या घटनांपूर्वी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. रोज नवे धाडसत्र सुरुच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. त्यात अनेक गुन्हेगारांंची झाडाझडती सुरु केली आहे.
त शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले.
पुण्यात मागील काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती.
सिंहगड रोड पोलिसांनी धायरी परिसरात राहणाऱ्या नीलेश शिवाजी गायकवाड (वय 35 वर्षे) याला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 145 कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला आहे.
पुण्यातील भोरी आळी या परिसरात अनेक लहान-मोठे दुकानं आहेत. याच परिसरातील दुकानावर छाटा टाकला आहे