Manoj Jarange Patil : अनवाणी पायाने शिवनेरी चढले, शिवरायांना अभिवादन केलं अन् जरांगे पाटील...
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजगुरूनगरच्या बहुप्रतिक्षित सभेआधी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं दर्शन घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळीच आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवनेरी किल्ल्यावर ते गेले. तिथे मनोभावे शिवाई देवीची पूजा केली.
मराठा आरक्षण लढ्यासाठी शिवरायांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आई शिवाईचं पाठबळ महत्त्वाचं आहे. आता लढा अधिक तीव्र होईल, अशा भावना त्यांनी शिवाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर बोलून दाखवल्या.
मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी 11 वाजता राजगुरूनगर येथे सभा आहे तर शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत देखील ते सभा घेणार आहेत.
दोन्ही सभांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम आता अवघ्या काही दिवसांत संपणार आहे. तत्पूर्वी ते लोकांशी संवाद साधतायेत.
लोकांनी संवाद साधून ते आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवत आहेत. आता मराठ्यांना रोखणं सोपं नाहीये. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाची घोषणा करावी, असं कळकळीने जरांगे पाटील सांगत आहेत.
सरकारकडून कुणबी वंशावळी तपासणीचं काम सुरू आहे. त्याकामी जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी अधिकारी जाऊन वंशावळी तपासत आहेत. मराठा बांधव देखील आपल्याकडे असलेले पुरावे समितीला सादर करत आहेत.
दरम्यान, अल्टीमेटम संपायच्या आधी सरकार आरक्षणाची घोषणा करणार की काही तांत्रिक कारणे दाखवून जरांगे पाटील यांच्याकडून वेळ मागवून घेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.