MPSC protest : कडाक्याच्या थंडीत अन् रखरखत्या उन्हात 34 तास MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर; सत्यजीत तांबेंचा आंदोलनाला पाठिंबा

मागील 36 तासांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं (Pune MPSC Student Protest) आंदोलन सुरुच आहे.

pune

1/8
मागील 36 तासांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं (Pune MPSC Student Protest) आंदोलन सुरुच आहे.
2/8
नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
3/8
आजही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन सुरुच आहे. काल रात्रभर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच होतं आणि आज सकाळपासून रखरखत्या उन्हात विद्यार्थी मागणी पूर्ण होईल या अपेक्षेने बसले आहेत. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती.
4/8
मात्र हा निर्णय घेऊन घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
5/8
सोमवारी सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पुण्यात सध्या रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसभर रखरखतं ऊन असं वातावरण आहे. याच थंडी उन्हाचा सामना करत विद्यार्थी आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
6/8
आज दिवसभर पुण्यात चांगलंच ऊन होतं. या उन्हातदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे रस्त्यावर उतरले आहेत.
7/8
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
8/8
त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
Sponsored Links by Taboola