Maharashtra Bandh : पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन!
पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंदोलनाच्या स्थळी शरद पावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना (Badlapur Minor Abuse) समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली होती.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.