संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन
Madan Das Devi Passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल बंगळुरूत निधन झालं.
Madan Das Devi Passed away
1/10
मदनदास देवी यांच्यवर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
2/10
देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत.
3/10
काल रात्री उशिरा ते पुण्यात दाखल झाले.
4/10
त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतील.
5/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही देवी हे अंत्यदर्शन घेतले.
6/10
तसंच राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत.
7/10
देवी यांचं पार्थिव आज सकाळी 11 वाजेपर्यंत संघाच्या मोतीबागमधील कार्यालयात ठेवण्यात आलंय.
8/10
त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
9/10
मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले.
10/10
आयुष्यातील जवळपास 70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले.
Published at : 25 Jul 2023 10:27 AM (IST)