Pune-mumbai Missing Link : दादा भुसेंकडून मुंबई-पुणे मिसिंग लिंकची पाहणी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे. याचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय, त्यामुळं सप्टेंबर 2024मध्ये हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज भुसेंनी लोणावळा ते खालापूर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सध्या लोणावळा ते खालापूर हे अंतर 19 किलोमीटर इतके आहे.
या प्रवासादरम्यान बोरघाटात होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ही कोंडी या मिसिंग लिंकमुळं फुटेल असा विश्वास सरकारला आहे.
सोबतच प्रस्तावित मार्गाने सहा किलोमीटरची आणि किमान अर्धा तासाची बचत होणार आहे.
एकूण 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जात आहेत.
पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी महत्वाचा ठरणारा मिसिंग लिंक सप्टेंबरमध्ये खुला होईल.
प्रत्यक्षात याची पाहणी केल्यावर दादा भुसेंनी असा दावा केला.