Indapur Well Accident : काम सुरु असताना अचानक माती विहिरीत कोसळली, चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
विहिरीच्या बाजूची माती विहिरीत कोसळू नये म्हणून रिंग टाकण्याचे काम सुरू होते. पण अचानक कडेची माती विहिरीत पडल्याने चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले गेले आहेत. पोकलेनच्या साह्याने विहिरितील माती बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला.
यामध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगार्याखाली अडकले गेले आहेत. ही घटना काल संध्याकाळच्या दरम्यान घडलीय. मात्र याचा उलगडा रात्री उशिरा झाला.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण वय आणि मनोज मारुती चव्हाण हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करत होते.
अचानक त्यांच्यावरती माती आणि विहिरीचा स्लॅब कोसळला आणि त्या ढिगार्याखाली ही कालपासून अडकले आहेत
हे चार कामगार नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी परतले नाही. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला.
विहिरीच्या बाजूला त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या मात्र ते चार लोक सापडले नाहीत आणि त्यांना फोनही लागले नाहीत.
त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे.
आमदार दत्तात्रय भरणे तहसीलदार श्रीकांत पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना या संदर्भात कळविण्यात आले असून एनडीआरएफ पथकही याठिकाणी दाखल झालं आहे.
एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून विहिरीतून माती काढण्याचं काम सुरू आहे.
या विहिरीचे काम बेकायदेशीर असल्याची तक्रार काही नागरिकांनी इंदापूर तहसीलदार यांना दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेतील चार जण हे बेलवाडी गावचे नागरिक असून, सदरील विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.
यामुळे या घटनेतील दोषीवर कायदेशीर कारवाई करून घटनेतील लोकांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी केली.