In Pics : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सुरक्षेसाठी महिलांनीच घेतल्या हाती काठ्या; पहा फोटो...
नृत्यांगना गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिच्या डान्स स्टाईलमुळे आणि तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यांमुळे गौमती पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचं समोर आलं आहे.
तिच्या कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला . हा सगळा प्रकार घडला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नेहमी प्रमाणे प्रचंड प्रमाणात गर्दी होती.
तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्नदेखील केला. कार्यक्रम सुरळीपणे पार पडावा यासाठी गावातील महिलांवर हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली.
या सगळ्या राड्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांना हा कार्यक्रम थांबवावा लागला.
काही वेळाने हा राडा थांबला आणि गौतमी पाटीलने पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली
अनेक कार्यक्रम गौतमीच्या नृत्यामुळे नाही तर तिच्या कार्यक्रमात झालेल्या गर्दी आणि गोंधळामुळे गाजले.
या कार्यक्रमातदेखील तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र थोड्यावेळा काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याची आयोजकांनी माहिती घेतली आणि कार्यक्रम पून्हा सुरु केला.