Old Pension Scheme : 'एकच मिशन, जुनी पेन्शन' ; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे

old pention sceme

1/7
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
2/7
यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प झाले आहेत. याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावरही होणार आहे.
3/7
राज्यभरातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी संप पुकारला आहे.
4/7
सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर असल्याचे समजतेय.
5/7
पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयासमोर हे सगळे कर्मचारी जमले होते.
6/7
यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या.
7/7
सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे कार्यालये ओस पडली होती.शाळाही ओस पडलेल्या बघायला मिळाल्या.
Sponsored Links by Taboola