Girish bapat Death : खासदार गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; कार्यकर्त्यांची आलोट गर्दी

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत.

girish bapat

1/7
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
2/7
संध्याकाळी साडे सहा वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
3/7
त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत.
4/7
सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता.
5/7
त्यामुळेच त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी गर्दी केली आहे.
6/7
पुण्यातील शनिवार पेठेत त्यांचं घर आहे. या घराच्या आवारत अनेक नागरिकांनी गर्दी केली आहे. 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी देत आहे
7/7
गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आणि नात असा परिवार आहे. गिरीश बापट यांच्या पत्नीचे नाव गिरीजा बापट असे आहे. तर त्यांच्या मुलाचे नाव गौरव बापट आहे. गौरव बापट यांच्या पत्नीचे नाव स्वरदा बापट असे आहे. अनेक लोक त्यांचं सांत्वण करण्यासाठी येत आहे.
Sponsored Links by Taboola