Gautami Patil : 'देख फिर होता है क्या' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील अन् पोरांनी थेट हाणामारी सुरु केली
गौतमी पाटीलच्या आदाकारीचा थरार रंगला. याच गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.
पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतर हा राडा आटोक्यात आला.
त्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात सापडला.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं
यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. दरम्यान रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली.
हा प्रकार इथच थांबला नाही तर या कार्यक्रमात ग्रामीण डोंगराळ भागातील तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत चांगलाच धुडगूस घातला.
यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले.