Ganpati Visarjan 2022 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह; जागोजागी ढोलपथकांचा गजर
Ganpati Visarjan 2022 : मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.
Ganpati Visarjan 2022
1/8
मुंबईसह आज महाराष्ट्रातील सर्व गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात होत आहे.
2/8
मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे. ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
3/8
पुण्यातील बेलगाव चौकातील राजा सुद्धा विसर्जनाच्या मार्गावर आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली आहे.
4/8
या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हातात झेंडे घेऊन ही भव्य मिरवणूक विसर्जनाच्या मार्गावर निघाली आहे.
5/8
भक्तांचा जनसागर या ठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जमला आहे.
6/8
दोन वर्ष कोरोना काळानंतर मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
7/8
भक्तांनी अगदी मनोभावे बाप्पाची पूजा केली, आनंद साजरा केला, आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्या.
8/8
आज बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी ही भव्य मिरवणूक निघाली आहे.
Published at : 09 Sep 2022 03:25 PM (IST)