उत्सव बाप्पाचा! तब्बल 51 किलो आईस्क्रीमचा मोदक दगडूशेठच्या चरणी अर्पण, पाहा Photo
मात्र, यंदाच्या उत्सवात मेरिडियन आइस्क्रीमतर्फे चक्क 51 लिटरचा आईस्क्रीमचा मोदक नैवेद्य बाप्पाला दाखाविण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदक आईस्क्रीम उत्सवमंडपात उपस्थित तब्बल 700 गणेशभक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आले.
मेरिडियन आईस्क्रीमचे निलेश चव्हाण म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे बाप्पाला आम्हा हा मोदक आईस्क्रीम चा नैवेद्य अर्पण करीत आहोत.
हा मोदक 51 लिटरचा असून गूळ, नारळ, इलायची, खसखस, आईस्क्रीम वापरून साकारण्यात आला आहे.
तसेच त्यावर चांदीचे वर्क आणि केशर देखील लावण्यात आले आहे.
मेरिडियन आइस्क्रीमच्या नांदेड सिटी येथील फॅक्टरीमध्ये तब्बल 7 दिवस हे मोदक आईस्क्रीम तयार करण्याचे काम सुरु होते.
तसेच याकरता 10 कारागिरांनी मेहनत घेतली आहे.
आज दगडूशेठ गणपती चरणी हे मोदक आईस्क्रीम आम्ही अर्पण करण्यात आला