Ganesh Chaturthi 2024 : पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात गणेशभक्तांची गर्दी; हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा साकार
पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासून गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जाते.
पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटे पासून गर्दी केलीये. अथर्व शीर्ष पठण झालं असून आरती संपन्न झाली.
बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक सुरू होईल आणि कोतवाल चावडी इथल्या पारंपारिक जागेत उभारलेल्या जटोली येथील श्री शिवमंदिर प्रतिकृती विराजमान होईल.
11 वाजून 11 मिनिटं या शुभ मुहूर्तावर दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल.
देशभरातील प्रसिद्ध आणि मोठ्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रसिद्ध आहे आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यात गणेशोत्सवा दरम्यान बापांची मूर्ती विराजमान होत असते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे 132 व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे.
मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येत असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होते.
या सगळ्या देखव्याचे काम आता पूर्ण झालेलं आहे.