Pune-Bengaluru Expressway : काळाचा घाला, पुणे-बंगळुरु महामार्गावरील भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी
Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Pune Bengaluru Expressway Accident
1/9
पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2/9
मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला.
3/9
ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही खासगी बस नीता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. ही बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती.
4/9
बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात झाला. ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.
5/9
चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतं.
6/9
अपघाताची माहिती मिळताच यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकूण 7 अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली.
7/9
बचाव पथकाच्या जवानांनी बसच्या मागील बाजूची काच फोडून दोरीचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं.
8/9
जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 22 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
9/9
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे आंबेगाव इथे मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करत आढावा घेतला.
Published at : 23 Apr 2023 12:19 PM (IST)