Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
आज सकाळी १०:३० वाजता मिरवणूक सुरु होऊन २४ तास होतील, तरी देखील नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. मागच्या एका तासात १८ मंडळे अलका चौकातून पुढे गेली आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलका चौकात तिन्ही बाजूने मंडळे येऊन थांबली आहेत.. पुढे जागा नसल्याने संथ गतीने मंडळे मार्गस्थ होत आहेत. पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत, गणपती मंडळे अलका चौकातून पटापट पुढे काढण्यासाठी आग्रही दिसून येत आहेत.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डी जे च्या आवाजावरून पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यात वादावादी झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका अलका चौकात आल्याकी प्रत्येक मंडळाचे महापालिकेकडून नारळ देऊन स्वागत केले जाते.
त्यानंतर त्या मंडळाने विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन करणे अपेक्षित असते.नमात्र अनेक मंडळे अलका चौकातून पुढं गेल्यावर देखील डी जे सुरु ठेवून कार्यकर्ते नाचतात. त्यामुळे पाठीमागील मंडळांची विसर्जन मिरवणूक रखडते.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक याहीवर्षी संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी डी जे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई करायला सुरुवात केल्यावर वाद झाला.