Datta Idol in Pune : पुण्यात वर्षातून एकदाच बँकेच्या लॉकरमधून बाहेर काढली जाते दत्तगुरुंची मौल्यवान मूर्ती, 113 वर्षे जुनी, साडेतीन किलो सोन्याची लोभस मूर्ती

Datta Idol in Pune : 113 वर्षांपूर्वी कोलकत्तावरुन आलेल्या एका भक्ताने पुण्यातील श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज ट्रस्टला ही साडेतीन किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भेट म्हणून दिली होती.

Continues below advertisement

Datta Idol in Pune

Continues below advertisement
1/7
पुण्यात दत्ताची मूर्ती आहे जी सोन्याची असून तिचं वजन 3.5 किलो आहे पण ती भाविकांना फक्त वर्षातून एकदाच पाहायला मिळते.
2/7
या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी चक्क एका बँकेत गर्दी होते.
3/7
113 वर्षांपूर्वी कोलकत्तावरुन आलेल्या एका भक्ताने पुण्यातील श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज ट्रस्टला ही साडेतीन किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भेट म्हणून दिली होती.
4/7
मात्र, ही मूर्ती कुठेही बाहेर ठेवली तर ती तिच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल.
5/7
त्यामुळे श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टकडून ही मूर्ती गेले 60 वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलीय.
Continues below advertisement
6/7
दरवर्षी दत्त जयंतीच्या पूर्वी असलेल्या गुरुवारी ही मूर्ती याच बँकेमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज त्याच निमित्ताने लोकांनी या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
7/7
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र 113 वर्षे जुनी सोन्याच्या दत्ताची मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी रांग आहे.
Sponsored Links by Taboola