In Pics : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली.
ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
गणरायाचे मनोहारी रूप डोळ्यात साठविण्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे बाप्पाचे रूप मोबाईल मध्येही अनेकांनी कैद केले.
नवे वर्ष सर्व गणेश भक्तांना आणि भारतीयांना सुख समृद्धी आणि आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा यावेळी ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या आहेत.
दर्शनासाठी दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
यावेळी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
मंदिराच्या कळसाला फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं आहे.