In Pics : मोशीतील कन्स्ट्रो इंटरनॅशनल 2023 एक्स्पोला मोठा प्रतिसाद
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने 12 ते 15 जानेवारीदरम्यान कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्स्पो हे निर्माण क्षेत्रातील प्रदर्शन भरविण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथील 30 हजार चौरस मीटर क्षेत्रावर प्रदर्शनाचा ढाचा साकारण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू, उपकरणे, प्रणाली व तंत्रज्ञान यांची माहीती देण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी ठरणारे आहे.
राज्यातील निर्माण क्षेत्रात कार्यरत असणारे व्यवसायिक प्रदर्शनाला भेट देणार आहेत.
तसेच, वस्तू रचना व स्थापत्य शास्त्राचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात भेट देणार आहेत.
दरम्यान, निर्माण क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर 12 ते 15 जानेवारीदरम्यान दररोज चर्चासत्र होणार आहे.
त्यामध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे विचार मांडतील. प्रदर्शनात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी सुरक्षाविषयी प्रात्यक्षिक केले जाणार आहे.