Pune News : आनंद दिघेंची परंपरा मुख्यमंत्र्यांनी सुरु ठेवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला भिमाशंकर मंदिरात अभिषेक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्तानं पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं.
दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे
एकनाथ शिंदेंनी ती परंपरा आजही ही कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनीही भीमाशंकराचं दर्शन घेतलं.
आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यानं भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
शेवटचा सोमवार असल्यानं भाविकांचीही मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचाही समावेश होता.
राज्याला दुष्काळी परिस्थितीतून मुक्त करावं, राजकारणाचं वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी आणि सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याची जाण द्यावी, असं वेगवेगळं मागणं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भीमाशंकराकडे मागितलं.