PCMC News : जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद
जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील सर्व भागातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहेत.
अनेक शाळा, महाविद्यालयेदेखील बंद आहेत.
जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बंदची हाक दिली होती.
त्याला सकाळच्या सत्रात पिंपरी-चिंचवडकरानी प्रतिसाद दिला आहे.
निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, पिंगळेगुरव, पिंपळे सौदागर भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद आहेत. अनेक कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत.
काही महाविद्यालयांनी परीक्षेचे आजचे पेपर रद्द केले आहेत. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.
या ठिकाणी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे धरून निषेध आंदोलने करण्यात येणार आहे.