गॅस टंचाईवर बायोगॅस ठरतंय वरदान, अवघ्या 24 हजारांत कायमस्वरूपी तोडगा!
Biogas : पीडिजात शेती करणाऱ्या बोडके कुटुंबियांना तर या बायोगॅसचा दुहेरी फायदा झालाय.
Continues below advertisement
Biogas
Continues below advertisement
1/10
गॅस टंचाईमुळं देशातील प्रत्येक कुटुंब चिंतेत आहे. पुण्यातील माण गावातील बोडके कुटुंबीय मात्र याला अपवाद ठरलंय.
2/10
कारण या संकटसमयी त्यांच्यासाठी बायोगॅस वरदान ठरलंय.
3/10
पीडिजात शेती करणाऱ्या बोडके कुटुंबियांना तर या बायोगॅसचा दुहेरी फायदा झालाय.
4/10
या यंत्रात रोज वीस किलो शेण आणि वीस लिटर पाण्यापासून त्यांना महिन्याला दोन सिलेंडर गॅस भेटतंय.
5/10
तुमच्याकडे शेण नसलं तर रोज दहा किलो ओला कचऱ्यापासून ही गॅसची निर्मिती होते. शिवाय हा बायोगॅस शेतीसाठी शेण खत ही तयार करतो.
Continues below advertisement
6/10
यासाठी सुरुवातीला 48 हजार रुपयांचा खर्च येतो, तर सरकारकडून 24 हजारांचं अनुदान ही मिळतं.
7/10
त्यामुळं अवघ्या 24 हजारांमध्ये तुमच्या दारातचं बायोगॅसचा हा प्रकल्प उभा राहतो.
8/10
याद्वारे महिन्याला दोन सिलेंडर गॅस म्हणजे वर्षाला चोवीस हजारांची बचत आणि वर्षाला अडीच लाखांचं सेंद्रिय खत ही मिळणार.
9/10
त्यामुळं शेतकऱ्यांना तर दुहेरी फायदा होतोय. शिवाय अवघ्या दोन महिन्याच्या आतचं तुमचा सर्व खर्च वसूल ही होतो.
10/10
रोज वीस किलो शेण आणि वीस लिटर पाण्यापासून त्यांना महिन्याला दोन सिलेंडर गॅस भेटतंय.
Published at : 28 Mar 2026 01:02 PM (IST)
= 10">