In Pics : भुशी डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांना नो एन्ट्री
राज्यभरात झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. धबधबे प्रवाहित होत आहेत. आनंदाची बाब म्हणजे लोणावळ्यातील भुशी धरणही ओव्हरफ्लो झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे.
. परंतु यंदाही पर्यटकांना या धरणावर जाऊन भिजण्याच्या आनंदाला मुकावं लागणार आहे. इथे पर्यटकांना येण्यास बंदी आहे.
पर्यटनबंदी झुगारुन आलेल्या पर्यटकांना लोणावळा पोलिसांनी हुसकावून लावलं. पर्यटनबंदी असल्याने पोलिसांनी अशी भूमिका घेतली आहे.
वीकएण्ड असल्याने पुणे-मुंबईचे पर्यटक या धरणावर हजेरी लावतील, त्यामुळेच खबरदारी म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोणावळा पोलिसांनी इथे बंदोबस्त ठेवला आहे.
यामुळे पर्यटकांचा तर हिरमोड झालाच, शिवाय पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या व्यापारीही संतप्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटनबंदी हटवली मग पुणे जिल्ह्यातील पर्यटनबंदी कायम का ठेवली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्यातील पुणे आणि मुंबईकरांचं हक्काचं तसंच आवडीचं ठिकाण म्हणजे भुशी धरण. दरवर्षी हजारो पर्यटक इथे येतात.
गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. यामुळे लोणावळ्याचा परिसर अत्यंत नयनरम्य झाला असून डोंगरदऱ्या हिरवा शालू परिधान केल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.