Pune News : अखेर भुशी धरण 'ओव्हरफ्लो'; पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी
राज्यभरासह पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात लोणावळ्यात 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे अखेर लोणावळ्यातील भुशी धरण (Bhushi Dam) ‘ओव्हरफ्लो’ झालं आहे.
भुशी डॅमच्या पायऱ्यावरून आणि सांडव्यांवरून पाणी वाहत आहे. तसेच परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळ परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले होते.
मात्र, यंदा पावसाचे उशीरा आगमन झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भुशी धरण उशिरा ओव्हरफ्लो झाले आहे.
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. भुशी धरण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तरुणांपासून लहानग्यांपर्यंत सर्वच पर्यटक भुशी धरणावर बघायला मिळतात.
पावसाचा जोर चांगला असल्याने धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्यावर परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांनीही या ठिकाणी धाव घेतली. भूशी डॅमच्या पायऱ्यावरून आणि सांडव्यांवरून पाणी वाहत आहे.
भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.