Photo : किल्ले वाफगाव इथं महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न
वाफेगाव किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. या वर्षी कर्तृत्ववान स्त्रियांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती. खेडच्या तेहसीलदार वैशाली वाघमारे, IAS स्नेहल धायगुडे, उज्वलाताई हाक्के, पूजाताई मोरे, ललिताताई पुजारी, संगीताताई पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर राज्याभिषेक केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिल्ले वाफगाव इथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, ढोल वादन आणि भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात पार पडला.
गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, ढोल वादन आणि भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर आणि होळकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसह अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य आणि देशभरातून उपस्थित होते.
वाफगावचा किल्ला ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. हा किल्ला लवकरच संवर्धित करू असे मत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर आणि होळकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसह अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला वाफगावचा किल्ला आजही दुर्लक्षित उपेक्षित आहे. त्याचे जतन संवर्धन व्हावं यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही होळकर म्हणाले.
महाराजा यशवंतराव होळकर या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे.
किल्ले वाफगाव इथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, ढोल वादन आणि भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात पार पडला.
राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला.