In Pics : महिलांचा प्रश्नच मिटला! पुण्यातलं चालतं-फिरतं पार्लर तुम्ही पाहिलंय का?
पुण्यात पहिलं चालतं फिरतं पार्लर सुरु झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सगळीकडे पार्लर, मेकअपवर महिला भर देत आहेत. त्यातच महिलांना अनेकदा पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हे 'सलॅान ऑन व्हील्स'ची निर्मीती करण्यात आली आहे.
सध्या सगळ्या महिलांमध्ये या 'सलॅान ऑन व्हील्स'ची चांगलीच चर्चा सुरु आहे.
अनेकदा खूप महत्वाच्या प्रसंगी, सलॅान ला जाऊन तयार होणं किंवा हेअर-स्किन- नेल्स ची निगा राखणं अवघड होतं.
सलॅान ॲपल ऑन व्हील्सच्या माध्यमातून आता ह्या सगळ्या सर्व्हिसेससाठी ग्राहकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नसणार आहे.
ही व्हॅन ग्राहकांकडे जाऊन त्यांच्या सोयीने सगळ्या सर्व्हिसेस पुरवणार आहे.त्यामुळे अनेक महिला वर्गाला याचा फायदा होणार आहे.
यात स्पा पासून तर स्किन ट्रिटमेंटपर्यंत सर्व सेवा पुरवल्या जाणार आहे.
सगळ्या लगबगीच्या प्रसंगी आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी सलॅान ॲपल ऑन व्हील्स हा उत्तम पर्याय आहे. हेअर, मेकअप, स्किन संबंधी अनेक सर्व्हिसेसचा लाभ घेणं आता ग्राहकांना खूप सुलभ होणार आहे. या व्हॅनमध्ये हायजीनची काळजी घेतली जाणार आहे.