Shiv srushti : अमित शाहांनी केली शिवसृष्टी थीम पार्कची सफर
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा पहिला टप्पा 'सरकारवाडा'चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, डॉ.प्रविण दबडगाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी सगळ्या नेत्यांनी या शिवसृष्टीच्या थीम पार्कची पाहणी केली.
शिवसृष्टीच्या पहिला टप्पा म्हणजेच सरकारवाड्याचं आज लोकार्पण करण्यात आलं.
या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे.
शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणार आहे.
‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन 'रणांगण', छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आहे.
महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.