Ajit Pawar : मराठे आक्रमक; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी बंदोबस्त वाढवला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीपाठोपाठ आता दौंडमध्येही अजित पवारांना विरोध होताना दिसत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांनी येऊ नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा यांनी घेतली होती.
त्यानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पत्र पोलीस प्रशासनाला दिला आहे.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे अजित पवारांच्या फ्लेक्सला काळे फसण्यात आले होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरुन मराठे राज्यात आक्रमक झाल्याचं दिसत आहे
राज्यातील नेत्यांच्या घरासमोर जाळपोळ करण्याचे प्रकार घडताना दिसत आहे.
त्यामुळेच बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.