In Pics: अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ; जनता दरबारासाठी लोकांच्या रांगाच रांगा
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेत आज अचानक वाढ करण्यात आली आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधे अजित पवार सध्या विकास कामांबाबत बैठक घेत आहेत.
मात्र जनता दरबारच्या निमित्ताने त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांना आज अजित पवारांना भेटू दिले जात नाही आहे.
दरवेळी जनता दरबारच्या माध्यमातून अजित पवार प्रत्येकाला भेटत असतात.
अजित पवार जिथे आहेत तिथल्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपअधीक्षक , तीन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणावं, धर्मवीर म्हणू नये अशी भुमिका घेतली.
त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार समोर आली.
त्यानंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.