In Pics : तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच शरद पवार पुण्याच्या 'काँग्रेस भवन'मध्ये; पहा फोटो
तब्बल 24 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस आहे. या दिनानिमित्त देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. स्थापना दिनानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं देखील कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं
काँग्रेस पक्षाकडून सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहापाणाला आमंत्रित करण्यात आलं होतं.
शरद पवार यांना देखील आमंत्रण दिलं असून, त्यांनी ते स्वीकारलं होतं. आज संध्याकाळी सात वाजता ते पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली.
कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी कॉंग्रेसमध्ये कार्यरत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
या वास्तु देशातील अनेक महत्वाच्या घडामोंडीची साक्षीदार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी अनेक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.